Categories
Poetry

वक्त वक्त कि बात

जो बित  गया वो कल था
तू आने वाले कल की फिकर कर ,
ज्यादा कम की लालच छोड़ 
बस  तू थोड़ा सबर कर 


क्या सही , क्या गलत  ये सब उलझन है 
तू अपने धर्म से वाकिफ रह ,
अंदरकी सच्चाई  कायम रख 
झूठे जज़्बातोमे मत बह


गलतिया जो  कल की थी
आज में वह दोहरा मत ,
सुधारनेका एक मौका है
बेवकूफियों में गवां मत


वक्त हर एक का आता है
 वक्त तेरा भी आएगा ,
दायरे जो तूने तोड़े है
कल तू खुद को कैद में पायेगा


            - प्रियंका ढिवरे 
Categories
Poetry

किस्मत बदली तो हज़ार आये

मायूस सी तक़दीर लेकर 
जब निकला था तुम्हारे आँगन से  
देख मेरा खाली हाथ 
दरवाजे तूने बंद  किये 
अब जो लौटा हु वापिस 
हालाथ पूछने चले आये 
क्या बात है.... 
आँखों पे दवा कर ली ???
जो नज़र आयी मेरी शुआएं 
                
           -प्रियंका 

(शुआएं - किरण , रौशनी )
Categories
Poetry

वजह नहीं

हालात कुछ ऐसे है के
चुप रहना भाने लगा है 
लाचार सा  दिल है  
चीखे उसकी छुपाने लगा है 
बैराग सी राह है 
राही मै  बैरागी हूँ  
कुछ पाने की चाह नहीं अब 
भटकता मै बंजारा हूँ
टूटकर टूटना सहा है मैंने
 टूटने के लिए कुछ बचा नहीं
तोड़ने वाला लाख पुकारे
मुड़ने के लिए अब वजह नहीं

                   -प्रियंका
Categories
Poetry

अंतःकरणी काय वेगळे

मिटता डोळे काळोख भासे
      अंतःकरणी काय वेगळे
मुखातून मधुर वाणी
       मनीं मात्र द्वेष दरवळे
स्ववेदना सहन न होती
       दुसऱ्या देता हर्ष जाहला
पाय खेचून मागे सारता
       विजयहर्ष आप गमावला
ज्या मार्गी पद चालितो
       प्रतिकृती  सोबत चाले
समयचक्रहि साथ देई
       कालची क्रिया , आज भोगले

                -प्रियंका ढिवरे

Categories
Poetry

कशासाठी ??

रोजची धावपळ 
निस्सीम ती धडपड
बिनशर्त जुळवाजुळव 
नक्की कशासाठी ??
इच्छा आहे 
अपेक्षा आहेत 
जिद्द आहे 
परंतु कशासाठी ??
ध्येय आहे 
प्राप्त करायचंय 
ठरलय !!!
हो !! परंतु नक्की कशासाठी ??


               - प्रियंका ढिवरे 


(कशासाठी ?? या प्रश्नाचं उत्तर मिळाले तर गुंतागुंतीचं अस्पष्ट जीवनरहस्य उलगडेल.  )
  








Categories
Poetry

संवाद माझा माझ्याशी

उसळणाऱ्या लाटांचा खडखडाट
मंद  हवेचा  स्पर्श
जणू जाणीव करून देत होते
माझ्या अस्तित्वाची
ते अस्तित्व
ज्याला मी स्वतःपासून
वंचित केले होते
आणि अचानक ... अचानक
 मला मी भेटले
हो .. माझ्यातली मी
निरागस तो चेहरा होता
आणि निर्मल ते हास्य
ते सोज्वळ चैतन्य
त्याच्या सुटकेबद्दल
जणू कृतार्थ होते
मी मोहक नजरेने
माझ्यातल्या मी ला अनुभवत होते
अणि तोच एक आवाज कानी आला
तो प्र्श्न होता...
स्वार्थ किती असावा ?
तू टिकून राहावीस
म्हणून तू मला डांबलेस
मला कैदेत ठेवून
तुला मनःशांती मिळाली ??
दुनियेच्या या मायाजालात
कठपुतळी बनून
काय प्राप्त केलस ??
आणि मी विचारात पडले
या प्रश्नांनी मला बेचैन केले
मी डोळे बंद करून
प्रश्नांची उत्तरे शोधू लागले
मी माझं अस्तित्व गमावलं का?
खरोखर मला आनंद मिळाला ?
स्वतःच मन मारून जगण्यात
मी काय मिळवलं ?
कारण काय ?
शर्यत.... ??
आणि कुणाशी ?
शर्यतीत धावता धावता
द्वेषभावनांना बळी पडले
मी स्वतःला विसरले
बस्स , आता प्राधान्य
माझ्यातल्या मी ला !!!
आणि मी डोळे उघडले
तोच समोरची प्रतिमा नाहीशी झाली
आणि मला मी सापडले
तो संवाद होता माझा माझ्याशी ...
     
                  - प्रियंका ढिवरे
Design a site like this with WordPress.com
Get started